शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:51 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?सोनिया गांधी कदाचित निवडणूक लढवणार नाहीत?रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्यावतीने आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने वर्तविली आहे. रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असे संकेत मिळत आहेत.

राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली. या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, राहुल गांधी देशाच्या कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९