शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: व्हेंटिलेटर आणि  पंतप्रधान दोन्हीही फेल; राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:11 IST

दोघांचाही मर्यादेपेक्षा अधिक खोटा प्रचार झाला आहे. दोघेही आपले काम करण्यात फेल ठरले आहेत

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आदी सुविधांअभावी देशात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पीएम केअर अंतर्गत दिलेले व्हेंटिलेटर आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात साम्य आहे. दोघेही काम करण्यात अयशस्वी ठरल्याची टीका राहुल गांधी केली आहे. 

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे की, दोघांचाही मर्यादेपेक्षा अधिक खोटा प्रचार झाला आहे. दोघेही आपले काम करण्यात फेल ठरले आहेत आणि गरज असते तेव्हा दोघांनाही शोधणे अवघड आहे.  व्हेंटिलेटरची कमतरता प्रत्येक राज्यात आहे. पंजाबमधून सुरु झालेला हा प्रकार आता देशाच्या छोट्या गावातूनही दिसत आहे. व्हेंटिलेटर मिळाले तरी त्याचा उपयोग होत नाही. केंद्र सरकारचा असा दावा आहे की, त्यांनी राज्यांना पर्याप्त व्हेंटिलेटर दिले आहेत. पण, राज्य सरकार त्याचा योग्य उपयोग करत नाही. 

कोणत्या राज्यात किती२३,६९९ व्हेंटिलेटर देशातील विविध हॉस्पिटलमध्ये लावण्यात आले. पीएम केअर फंड अंतर्गत केंद्र सरकारने खरेदी केलेल्या ७९४८ व्हेंटिलेटरचाच हा एक भाग होता. केंद्र सरकारचा असा दावा आहे की, विविध राज्यांना ३६,८२५ पैकी ३०,८९३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.  महाराष्ट्राला ४४३४ व्हेंटिलेटरचे वाटप झाले. यातील ४४२७ व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला आहे. ३५५९ व्हेंटिलेटर संबंधित ठिकाणी बसविण्यात आले आहेत. 

धूळखात पडूनउत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात केंद्र सरकारने पाठविलेल्या व्हेंटिलेटर्सचे बॉक्स अद्याप खुले केले नाहीत. कारण, व्हेंटिलेटर चालविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नाही. तर, काही ठिकाणी व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. फिरोजाबादमध्ये २७ पेक्षा अधिक व्हेंटिलेटर पडून आहेत. कारण, गुणवत्तेबाबत डॉक्टर समाधानी नाहीत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या