शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Punjab Election 2022:  १२ काँग्रेस आमदारांचा पत्ता कट?, काँग्रेसमध्ये खळबळ; सोनिया गांधींनी रचला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:13 IST

इतकचं नाही तर काँग्रेसच्या ८६ जणांच्या पहिल्या यादीनंतर १२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ माजली आहे.

चंदिगड – काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश सोडून आता पंजाबवर लक्ष केंद्रीत केले आहे. सोनिया गांधींनी मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी न ऐकता ८६ जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस सुप्रीमोने त्यांची कोअर टीम पंजाबच्या प्रत्येक क्षेत्रात काम करतेय त्यांच्या सर्व्हेनंतर या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर काहीही व्होवो, परंतु आतापर्यंत सोनिया गांधी(Sonia Gandhi) आणि त्यांच्या कोअर टीमच्या उमेदवारी निवडीवर चर्चा सुरु आहे. उमेदवारांची यादी पाहिली तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग(Capt Amrinder Singh) यांचं निवडणुकीचं गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसनं पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीयांना तिकीट देऊन मास्टरस्ट्रोक खेळला आहे. यादीत मागच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नेत्यांचाही समावेश आहे.

आता अमरिंदर सिंग काय करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण अमरिंदर सिंग निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अनेक दिग्गज त्यांच्यासोबत येतील असा दावा करत आहेत. परंतु अद्यापही असं काही झालं नाही. सर्वांची नजर काँग्रेसच्या तिकीट वाटपावर होती. त्यातही काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी जागा सोडली नाही.

सोनिया गांधींचा राजकीय प्लॅन

काँग्रेसनं कॅप्टनचे निकटवर्तीय असलेले आमदार गुरुप्रीत कांगड, साधु सिंग यांना तिकीट दिली आहे. कॅप्टन यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसनं त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली होती. आमदार बलबीर सिद्धू आणि सुंदर शाम अरोडा यांच्यासोबतही ते कॅप्टनच्या जवळचे असल्याचं सांगितले गेले. परंतु या दोघांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्याशी जवळीक असल्याचं म्हटलं जातं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लुधियानाच्या दाखा येथून कॅप्टन संदीप संधू यांना तिकीट दिले आहे. जे कॅप्टनच्या सर्वात जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत.

काँग्रेसमध्ये मंत्री राणा गुरजीत यांनाही कॅप्टनच्या जवळचं मानलं जायचं. त्यांना सुरुवातीला मंत्रिपद आणि आता तिकीट दिलं आहे. त्याचप्रकारे आक्रमक नेते सुखपाल खैहरा जेलमध्ये असतानाही त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. ते ईडीच्या केसमध्ये पटियाला जेलमध्ये बंद आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

१२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ

इतकचं नाही तर काँग्रेसच्या ८६ जणांच्या पहिल्या यादीनंतर १२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेसनं त्यांच्या ४ आमदारांचा पत्ता कट केला आहे. सध्या पक्षाने एकूण १२ आमदारांना वेटिंग लिस्टवर ठेवलं आहे. या आमदारांना तिकीट नाकारणार किंवा त्यांचा मतदारसंघ बदलणार अशा चर्चा सुरु आहेत.

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंग