शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

Mamata Banerjee: १९६ सदस्यांच्या पाठिंब्यासह ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय, सदस्यत्वाचा मार्गही मोकळा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:13 IST

Legislative Council in West Bengal: राज्यात विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी प्रस्तावाला मान्यता दिली होती.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेने मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील कलम ३६९ अन्वये राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव पारित केला. सभागृहात उपस्थित असलेल्या एकूण २६५ सभासदांपैकी १९६ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. ( Legislative Council in West Bengal) तर ६९ सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. (Mamata Banerjee) राज्यात विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी प्रस्तावाला मान्यता दिली होती. (Proposal for establishment of Legislative Council in West Bengal passed, 196 members supported)

राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेच्या स्थापनेसाठी सभागृहात झालेल्या मतदानावेळी उपस्थित नव्हत्या. दरम्यान, देशामध्ये सहा राज्यांत विधान परिषदा अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सध्या विधान परिषदा आहेत. आता विधान परिषदेच्या स्थापनेसाठी विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर आता त्यासाठी संसदेमध्येही विधेयक पारित करावे लागेल, अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेच्या स्थापनेमध्ये केंद्र सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

तत्पूर्वी ममता बॅनर्जी सभागृहात म्हणाल्या की, भाजपाचे आमदार हे शिष्टाचार आणि सभ्यता जाणत नाहीत. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे हे सिद्ध झाले आहे. २ जुलै रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी भाजपाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यामुळे राज्यपालांना अभिभाषणातील काही भाग वाचून भाषण आटोपते घ्यावे लागले होते. बंगालमध्ये निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारावरून भाजपाचे आमदार घोषणाबाजी करत होते.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सभागृहात आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या की, राज्यामध्ये भाजपा आमदारांनी केंद्रातील भाजपा सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अडथळा आणता कामा नये होता. मी राजनाथ सिंहांपासून ते सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेक भाजपाच्या नेत्यांना पाहिले आहे. मात्र हा भाजपा वेगळा आहे. हे भाजपा सदस्य संस्कृती, शिष्टाचार, सभ्यपणा जाणत नाहीत. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानभेचे अधिवेशन २ जुलै रोजी सुरू झाले होते. हे अधिवेशन आठ जुलैपर्यंत चालणार आहे. विधानसभेमध्ये २०२१-२२ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणVidhan Parishadविधान परिषद