शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:13 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

गाझियाबादः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या कामाचा हिशेब मागण्याऐवजी आपण पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणता यशस्वी निर्णय घेतला, त्याचा लेखाजोगा जनतेसमोर ठेवावा. काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटं बोलत आहेत.भाजपाच्या पाच वर्षातल्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. ते म्हणतात, नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी तुम्ही काय केलं?, पाच वर्षांत देशातील कोणती कामं केली?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्या म्हणाल्या, स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणं ठोकतात.पाच वर्षांत वाराणसीतल्या कोणत्या गावात जाऊन आपण गरिबांशी पाच मिनिटं देखील बोललात हेसुद्धा सांगावं, ते पूर्ण जग फिरले आहेत. त्यांनी जपानच्या लोकांची गळाभेट घेतली. अमेरिकेतील लोकांना मिठी मारली, पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, चीनमधल्या लोकांचीही गळाभेट घेतली. परंतु वाराणसीतल्या एकाही गरीब कुटुंबांची कधी गळाभेट घेतलीत काय?, असा प्रश्नही प्रियंका गांधी विचारला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी