शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 12:24 IST

लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे.

प्रयागराजः लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनीही काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ मोठमोठ्या बाता मारतात, पण विकास काहीच दिसत नाही. जे 56 इंच छातीवाले आहेत, ते रोजगार का उपलब्ध करून देत नाही, असा सवालही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. सीतामढीमध्ये प्रियंका गांधींनी मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्ही शक्तिमान आहात, तुमची 56 इंचाची छाती आहे. मग रोजगार उपलब्ध करून का नाही दिलात, कारण हीच तुमची दुर्बलता आहे. हे कमकुवत सरकार आहे. पाच वर्षांत केंद्र सरकारनं काहीही केलेलं नाही.70 वर्षांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी मोदी सरकारला घेरलं. 70 वर्षांच्या रडगाण्यालाही एक्सपायरी डेट असते, हे विसरू नका, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. तर काल प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. चौकीदार हे गरीब शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी यावेळी सपा-बसपावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. आम्हाला कोणावाचूनही काही समस्या नाही. आमचा उद्देश भाजपाला हरवण्याचा आहे. तोच उद्देश त्या लोकांचा आहे.काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी हल्लाबोल केला होता. आमचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे, त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा दिला आहे. मायावती यांनी ट्विट करत सांगितले की, काँग्रेसने 7 जागा सपा-बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येत आहे.  काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केले आहे. मायावती यांनी काँग्रेसला 80 जागांवर लढावं, असं आव्हान दिलं आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक