शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

पंतप्रधानांचा विदेश दौरा

By admin | Updated: April 19, 2015 00:00 IST

जून महिन्यात दोन दिवसाच्या (१६ ते १७ जून ) भूतान दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपारीक पध्दतीने भूतानचे राजे जिग्मे खेसर नामजीएल वांगचुक आणि राणी जेत्सून पेमा यांनी स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा व तो भारताच्या शेजारील राष्ट्राचा असल्यानं त्याला विशेष महत्व प्राप्त झालं ...

जून महिन्यात दोन दिवसाच्या (१६ ते १७ जून ) भूतान दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपारीक पध्दतीने भूतानचे राजे जिग्मे खेसर नामजीएल वांगचुक आणि राणी जेत्सून पेमा यांनी स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा व तो भारताच्या शेजारील राष्ट्राचा असल्यानं त्याला विशेष महत्व प्राप्त झालं होतं.

भूताननंतर जुलै महिन्यात (१३ ते १६ जुलै )ब्राझिल दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिल रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांमध्ये झालेल्या ६ व्या ब्रीक्सच्या शिखर परिषदेला संबोधित केले.

ऑगस्ट महिन्यात (३ ते ४ ऑगस्ट ) नेपाळ दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडू येथील जगप्रसिध्द पशूपतीनाथ मंदिरात जावून विधीवत पूजा केली. यावेळी मोदी यांनी नेपाळच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर )जापानचा विदेश दौरा केला. या दौ-यावर टोकियोमध्ये असताना पारंपारीक ढोल वाजविण्याचा मोह मोदी यांना आवरता आला नाही. मोदी यांच्या ढोल वाजविण्यावर काँग्रेसकडून बरीच टीकाही करण्यात आली होती.

सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुचर्चित अमेरिकेचा (२६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर )दौरा केला. मुख्यमंत्री असताना अमेरिकेने मोदी यांना व्हिसा नाकारला होता परंतू पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेने त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले. मोदी यांनी अमेरिकेच्या बहुचर्चित मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अमेरिकन भारतीयांसमोर तडाखेबंद भाषण केले.

नोव्हेंबर महिन्यात म्यानमार (११ ते १३ नोव्हेंबर ) ऑस्ट्रेलिया (१४ ते १८ नोव्हेंबर ) फिजी (१९ नोव्हेंबर ) नेपाळ (२५ ते २७ नोव्हेंबर )दरम्यान विदेश दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सार्क परीषदेला संबोधित केले. तसेच ऑस्ट्रेलियातील ब्रीस्बेनमध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण केले.

मार्चमध्ये मोदी यांनी सेशल (१० ते ११ मार्च ) मॉरिशस (११ ते १३ मार्च ) श्रीलंका (१३ ते १४ मार्च ) सिंगापूर (२९ मार्च )असा दौरा केला. जगातील प्रमूख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या मॉरिशसचे नैसर्गिक सौंदर्य टिपण्याचा मोह पंतप्रधानांना आवरता आला नाही. मोबाईलमध्ये मॉरिशसचे नैसर्गिक सौंदर्य टिपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स (९ ते १२ एप्रिल ) जर्मनी (१२ ते १४ एप्रिल )आणि कॅनाडा (१४ ते १६ एप्रिल )दरम्यान दौरा केला. फ्रान्सच्या दौ-यावर असताना पंतप्रधानांनी फ्रेंच स्पेस एजन्सीला भेट दिली असता याठिकाणी शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसोबत असा सेल्फी काढला.

जर्मनी दौ-यावर असताना जर्मनीमधील हॅन्नोव्हर या ठिकाणी बांधण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना हॅन्नोव्हर शहराचे महापौर.

२६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत १६ देशांना भेटी दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या विदेश दौ-यावर विरोधकांकडून टीका होत आहे परंतू पंतप्रधानांचा विदेश दौरा मे महिन्यांपासून पुन्हा एकदा सुरू होत असून ते यावेळी चीन मोंगलिया दक्षिण कोरीया या राष्ट्रांना भेटी देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशांना कधी भेट दिली याबाबतचा हा फोटो वृत्तांत......