शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली

कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशामधील वाढती बेकारी, शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी गंभीर समस्यांना मोदीच जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.ते म्हणाले की, मोदींच्या कारभारामुळे रोज देशातील २७ हजार युवक बेकार होत आहेत. कृषी क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने मोदी यांनी स्वत:चा उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये दिले. हे एकप्रकारे देशद्रोही वर्तनच आहे. या गैरकृत्यांबद्दल मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आर्थिक मागासलेपण, शेतीच्या समस्या तसेच भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांबद्दल देशात सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. पण मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.

केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. केरळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढत असल्याने त्यांच्या या दौºयाला विशेष महत्त्व होते. लोकसभा निवडणुकांच्या तिसºया टप्प्यात केरळमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. 
>‘खोटी आश्वासने देणार नाही’वायनाडमधील जनतेला मी खोटी आश्वासने देणार नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहील असे राहुल गांधी यांनी प्रचारसभेत सांगितले. मी इथे ‘मन की बात‘ सांगायला नव्हे, तर लोकांच्या मनातले जाणून घ्यायला आलो आहे असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्या अस्थींचे तीस वर्षांपूर्वी वायनाड परिसरातील तिरूनेल्ली मंदिराजवळ पापनाशिनी नदीत विसर्जन करण्यात आले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019