शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अडचणीत, जांगीरपूरमध्ये यशाचा मार्ग कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:24 IST

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपने पश्चिम बंगालमध्ये जांगीरपूर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि माकपच्या मतांना फाटे फोडण्यासाठी मुस्लिम महिलेला उमेदवारी दिली असली तरी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांच्यासाठी यशाचा मार्ग खूपच कठीण आहे.जांगीरपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. कधी तेथून प्रणव मुखर्जी, तर कधी त्यांचा मुलगा जिंकला. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात कट्टर वैर असतानाही मुखर्जी यांना अनेक दशके त्रास झाला नाही. आता मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४२ मतदारसंघांमागे आपली शक्ती लावण्याचे ठरवल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या निवडणुकीत अभिजित मुखर्जींनी चौरंगी लढतीत फक्त ८ हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हा भाजप राज्यात अजिबात महत्त्वाचा नव्हता, तरीही त्याचे उमेदवार सम्राट घोष यांना ११ लाखांपैकी जवळपास एक लाख मते मिळाली. या मतदारसंघात मतदारांची संख्या खूपच वाढून ती १६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे व त्यातील ७० टक्के मुस्लिम आहेत. येथे २३ एप्रिल रोजी मतदान होईल.मुखर्जी यांनी मोदी सरकारशी चांगले संबंध निर्माण केले. मोदी सरकारने मुखर्जी यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला व मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर भाजपने माकपमधून आलेल्या मुस्लिम महिलेला जांगीरपूरमध्ये उमेदवारी दिली. राज्यात माकपची घसरण वेगाने झाली. त्याचे कार्यकर्ते एक तर भाजपमध्ये किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. माकपने तुलनेने नवा चेहरा झुल्फीकार अली यांना, तर तृणमूल काँग्रेसने खलीऊल रेहमान यांना उमेदवारी दिली आहे.भाजपने मुस्लिम मते विभागली जावीत यासाठी मफुजा खातूम यांना उमेदवारी दिली आहे. भाजप सर्व ४२ जागा लढवत आहे. अभिजित मुखर्जी यांना मदत व्हावी यासाठी भाजपने मुस्लिम महिलेला उभे केले. दुसरा एकच मुस्लिम उमेदवार भाजपने दिला, ते तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री हुमायून कबीर. हे दोन अपवाद वगळता देशात भाजपने ४६०पैकी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही.>काय आहेत अडचणी?काळजीत पडलेल्या प्रणव मुखर्जी यांनी आता स्वत: लक्ष घातले आहे. ममता बॅनर्जी यांनी अभिजित मुखर्जी यांना मदत न करण्याची ठाम भूमिका घेतली. काँग्रेसला माकपबरोबर निवडणूक युती करण्यात अपयश आल्यामुळे यावेळी अभिजित मुखर्जी यांचे भवितव्य संकटात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019jangipur-pcजंगीपूर