शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी माहिती दडवल्यानंच आज देशावर भीक मागायची वेळ- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 13:14 IST

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई- भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीशरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दाऊद भारतात येण्यास तयार होता, पवारांनी मध्ये खोडा घातला, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुषमा स्वराज्य यांनी दोन दिवसांपूर्वी दाऊद आणि मसूद अझहर यांना भारतास सोपविण्याची मागणी केली. मात्र काही वर्षांपूर्वी स्वतः दाऊदने भारतात परत येण्याची इच्छा राम जेठमलानी यांच्याकडे व्यक्त केली होती. जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांना दिली होती. याबाबत तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांनी याबाबतची माहिती तत्कालीन पंतप्रधानांना दिली होती का? यंत्रणांना दिली होती का? किंवा दाऊदच्या समर्पणाचा निर्णय त्यांनी स्वतःच्या पातळीवर का नाकारला, याचे शरद पवारांनी उत्तर द्यावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.1993च्या मुंबई बॉम्बस्फोट व दंगलीचा मास्टर माइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या, अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी होऊ इच्छितो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं. तसेच या निर्णयात यूपीए सरकारसुद्धा सहभागी आहे, असे सांगितले.जर दाऊद समर्पण करायला तयार होता, तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करून घेतले नाही, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. तसेच ज्यावेळी हे सर्व उघड झाले, त्या वेळी म्हणजेच 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बीजेपी सरकार होते, मग त्यांनी सुद्धा दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. काँग्रेस कोणत्या आधारावर राष्ट्रवादीसोबत आघाडी करत आहेत. दाऊद शरण येत असताना त्यात खोडा घालणारे शरद पवारांशी आघाडी कशी करता. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी दाऊदप्रकरणी खोडा घालणा-या पवारांच्या घरी कसे काय जातात, याचे उत्तर मोदींनीही द्यावे. थर्ड डिग्री लावू नका, इतकीच दाऊदची मागणी होती. जेठमलानी यांनी या भेटीबाबत आणि दाऊदच्या शरण येण्याच्या इच्छेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना अवगत केले होते. मात्र पवारांनी ही माहिती दडवून ठेवल्याची टीकाही आंबेडकरांनी केली आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक