शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मामा-भाच्याच्या सत्ताकारणासाठी भोसरीकर करताहेत मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:53 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली सुरू आहेत.

नितीन शिंदे भोसरी : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली सुरू आहेत. शिरूरसाठी भाजपातून महेश लांडगे व राष्ट्रवादीकडून विलास लांडे इच्छुक आहेत. मात्र, भोसरीतील मामा-भाचे यांनी विरोधात लढण्याऐवजी एकमेकांना साथ द्यावी, अशी मोर्चेबांधणी भोसरीकरांकडून केली जात आहे. युती व आघाडी होणार असल्याची गृहीत धरून लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून विलास लांडे व विधानसभेसाठी महेश लांडगे यांनी निवडणूक लढवावी, अशी दोन्ही बाजूंच्या समर्थकांची मागणी आहे.लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील भाजपा-शिवसेना युतीचे जागा वाटपावरून घोडे अडले आहे. मात्र, युतीच्या समीकरणावर दोन्ही पक्षांतील इच्छुकांची रणनीती ठरणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात युतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी तयारी ठेवली आहे. युती न झाल्यास शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील व भाजपाकडून आमदार महेश लांडगे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, युती झाल्यानंतर महेश लांडगे पुन्हा भोसरी विधानसभेसाठी दावा करणार आहेत. त्याच वेळी माजी आमदार विलास लांडे यांनीही राष्ट्रवादीतून लोकसभा व विधानसभा दोन्हींसाठी दावा केला आहे.महेश लांडगे हे विलास लांडे यांचे भाचेजावई आहेत. मात्र, गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मामा-भाचे आमनेसामने आले. त्यामध्ये लांडगे यांनी मामा विलास लांडे यांच्यावर मात केली होती. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक एकच असल्याने त्यांच्यासह समर्थकांचीही पंचाईत झाली होती. आगामी लोकसभा अथवा विधानसभेत मामा-भाचे पुन्हा एकमेकांविरोधात लढू नये, अशी आखणी भोसरीकरांकडून केली जात आहे. त्यासाठी विलास लांडे यांना शिरूर लोकसभा व महेश लांडगे यांना भोसरी विधानसभेसाठी साथ देण्याची मागणी समर्थकांकडून केली जात आहे. दोघांचे मनोमिलन घडविण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.>चौकार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीतीशिरूर लोकसभेत शिवसेनेचे आढळराव हे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा चौकार अडविण्यासाठी मी शिरूरमध्ये लढण्यास तयार असल्याचे रणशिंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमांत फुंकले होते. त्यामागे मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना चुचकारणे होते. शिवाय पुण्यात झालेल्या बैठकीत विलास लांडे यांना शिरूरची तयारी करण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९