मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून हे प्रकरण सातत्याने लावून धरण्यात येत असल्याने महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांना सक्त आदेश दिले आहेत. (Pooja Chavan Suicide Case)या प्रकरणी विरोधी पक्षाकडून तसेच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत संजय राठोड यांची थेट प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त आदेश देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेकडून राठो़ड यांना देण्यात आले आहेत. राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने संजय राठोड यांना अशी सूचना करण्यात आली आहे.गेल्या पाच-सहा महिन्यांत नाजूक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दिशा सालियनची आत्महत्या, तसेच धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप यामुळे सरकार अडचणीत सापडले होते. हे वाद निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
Pooja Chavan : मंत्र्यावरील आरोपांमुळे शिवसेना गंभीर, संजय राठोड यांना दिला मोठा आदेश
By बाळकृष्ण परब | Updated: February 13, 2021 14:25 IST
Shiv Sena gives order to Sanjay Rathore after allegations in Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे.
Pooja Chavan : मंत्र्यावरील आरोपांमुळे शिवसेना गंभीर, संजय राठोड यांना दिला मोठा आदेश
ठळक मुद्देहोत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त आदेश देण्यात आले आहेप्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेकडून राठो़ड यांना देण्यात आले आहेराठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने निर्णय