शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Pooja Chavan : "हे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचं अवमान प्रदर्शन," संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका

By बाळकृष्ण परब | Updated: February 23, 2021 12:35 IST

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod in Pohragad : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले असून, घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाने झाले.

मुंबई/यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले असून, घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाने झाले. दरम्यान, संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आता या गर्दीवरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. (Sudhir Mungantiwar Criticize Sanjay Rathod Says, "This is not a show of strength, but an insult to the Chief Minister")संजय राठोड हे पोहरादेवी येथे येत असताना त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड म्हणाले की, कोणत्याही आरोपाला शक्तिप्रदर्शनाने उत्तर देता येत नाही. तसेच शक्तिप्रदर्शनातून निर्दोषत्व सिद्ध होत नाही. त्यासाठी चौकशीला सामोरे निर्दोषत्व सिद्ध करावे लागते. निर्दोष असतील तर संजर राठोड यांनी पोलीस ठाण्यात जाऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे. निर्दोष असतील तर ते सिद्ध होईल.कोरोनाच्या काळात अशी गर्दी जमवणे वाईट आहे. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आज गर्दी जमवण्याऐवजी त्यांनी पहिल्याच दिवशी समोर येऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे होते. दरम्यान. संजय राठोड करत असलेले शक्तिप्रदर्शन हे शक्तिप्रदर्शन नसून हे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे अवमान प्रदर्शन आहे. एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या, आवाहनाच्या ठिकऱ्या उडवल्या आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले की, तुमच्या आवाहनाला जनता सोडा तुमच्या सरकारमधील मंत्री भीक घालत नाही.मात्र सच परेशान होता है पराजित नाही. आता केस दाबली तरी पुढे दोन वर्षांनी, चार वर्षांनी हे प्रकरण बाहेर येईल. उत्तर प्रदेशमधील अमरमणी त्रिपाठीच्या प्रकरणात पाहिले की, ते काही दिवस वाचले. मात्र आता ते जन्मठेप भोगत आहेत, असे संकेतही सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार