शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बदल्या, पदोन्नतीचे रॅकेट, देवेंद्र फडणवीसांचा आरोप; केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:21 IST

या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.

मुंबई / नवी दिल्ली : पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच अहवाल दिलेला असताना दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बाजूला करण्यात आले, असा आरोप करत यासंबंधीचा तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख, पोलीस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील कथित पत्रव्यवहार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला.

या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. या डेटामध्ये अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांची नावे असल्याचा दावा करत यातील केवळ पत्रव्यवहार  उघड करीत असून अधिक तपशील उघड करणार नाही, असे फडणवीस यांनी मुंबईत  सांगितले. पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी गुप्तवार्ता आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता. असे करण्यापूर्वी त्यांनी एसीएस-गृह यांची रीतसर परवानगीही घेतली होती. हा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाकडे सादर केला. या अहवालात सीआयडी चौकशीची शिफारस केली होती. पण, तसे न करता रश्मी शुक्ला यांचीच उचलबांगडी झाली. या अहवालात ज्या नियुक्त्या व पदोन्नतींसाठी देवाणघेवाणीचा उल्लेख आहे, तीच  यादी प्रत्यक्षात निघाली. त्यासाठी  तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर सुद्धा दबाव होता. पण, त्यांनी तो झुगारला, असे फडणवीस म्हणाले.

सीलबंद पुरावे  महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय