शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न सहा वर्षांनी पूर्ण; केंद्राच्या 'या' योजनेत महाराष्ट्रही होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:56 IST

PM Narendra Modi News: उद्योजक, गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजना सुरू

हरिश गुप्ता नवी दिल्ली : उद्योजक तसेच गुंतवणूकदारांना विविध परवानग्यांसाठी दहा ठिकाणी चकरा माराव्या न लागता एक खिडकी योजनेद्वारे त्यांची सर्व कामे व्हावीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न ते २०१४ साली केंद्रात सत्तेवर आल्यानंतर सहा वर्षांनी पूर्ण होत आहे. या एक खिडकी योजनेत गोवा, गुजरातसारखी सहा राज्ये सहभागी झाली असून, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू ही राज्ये काही दिवसांनंतर सहभागी होणार आहेत.

या एक खिडकी योजनेमुळे कोणत्याही उद्योजकाला परवानग्यांसाठी फारसा त्रास न होता देशाच्या कोणत्याही भागात आपला उद्योग स्थापन करता येणार आहे. या एक खिडकी योजनेचे बहुतांश काम ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे उद्योग सुरू करण्याकरिता राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या परवानग्या मिळविण्यासाठी जी धावपळ करावी लागते ते श्रम आता कमी होतील.

देशात उद्योगांच्या स्थापनेसाठी किती जमीन उपलब्ध आहे, त्या परिसरातील पर्यावरण कसे आहे व अन्य माहिती एकत्रित करून ती उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. या खात्यातील उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापारविषयक विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती संकलित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या एक खिडकी योजनेमध्ये हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओदिशा, गोवा ही सहा राज्ये याआधीच सहभागी झाली आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्ये लवकरच या योजनेत सहभागी होतील.२७ उद्योगांवर लक्ष केले केंद्रितमेक इन इंडिया मोहिमेच्या दुसºया टप्प्यात २७ क्षेत्रांतील उद्योगांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यातील १५ उत्पादन क्षेत्रांबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी वाणिज्य खात्यातील उद्योग प्रोत्साहन व अंतर्गत व्यापारविषयक विभागातर्फे काम सुरू आहे तर वाणिज्य विभागाकडून अन्य १२ क्षेत्रांबाबतच्या कृती आराखड्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक