शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 19:33 IST

भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र : पवार-आंबेडकर वादाचे निमित्त

- राजेश शेगोकार, अकोला

जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पे पत्थर नही मारा करते...हिंदी चित्रपटातील हा संवाद दार्शनिक ठरला आहे. राजकारण या क्षेत्राला तर तो चपखलपणे आरसा दाखवितो. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या अकोल्यात भारिप-बमंस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांची दगडफेक ही काचेच्या घरात राहणाऱ्यांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. या आरोपांच्या सत्राला निमित्त ठरले ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भारिप-बमंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांवर केलेले आरोप.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आघाडीसाठी आंबेडकरांची गळाभेट घेतली. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी करू; पण राष्ट्रवादी सोबत नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. ज्यावेळी आंबेडकरांनी पाठिंबा घेतला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? असा सवाल उपस्थित केल्यावर पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे. अकोला ही आंबेडकरांची राजकीय राजधानी त्याला अपवाद कशी ठरेल. अकोल्यात राष्ट्रवादीच्या झाडून सर्व नेत्यांनी एकत्र येत आंबेडकरच खोटे असे हे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका अतिशय आक्रमक होती, त्यामुळे त्यांनाच टार्गेट करीत दुसऱ्या दिवशी भारिपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्यांची वैचारिक पातळीच काढली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वऱ्हाडाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर या दोन्ही पक्षांनी कधी ना कधी एकमेकांना सहकार्य करून सत्ता उपभोगल्याचे स्पष्ट होते.

अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर भारिप-बमसंला कधीही एकहाती सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाचा टेकू घ्यावा लागला, तर कधी अपक्षांना हाताशी घ्यावे लागले. यामध्ये भारिपाला काँग्रेस सोबत राष्ट्रवादीचेही वावडे नव्हतेच. सध्याही अकोला जिल्हा परिषदेत भारिपला राष्ट्रवादीचा टेकू आहेच. इतकेच नव्हे तर पुंडलिकराव अरबट यांच्या रूपाने सभापती पदही राष्ट्रवादीला दिले आहे. शरद पवार जातीयवादी आहेत, तर मग त्यांचा पक्ष जिल्हा परिषेदच्या सत्तेत भारिपला कसा चालतो? या प्रश्नाचा दगड राष्ट्रवादीने भारिपच्या घरावर मारला आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीवर भारिपने आगपाखड केली आहे. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेचे विदर्भातील सर्वाधिक आक्रमक नेते. थेट बाळासाहेबांचे लाडके अशी त्यांची ओळख व ख्याती होती. त्यांनीही सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पुन्हा सेना व आता पुन्हा राष्ट्रवादी अशी संगीत खुर्ची खेळली आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्षांतर करून आले आहेत, तर काहींची छुपी युती लपलेली नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतही; मात्र सरसकट साधन शुचिता कुठल्याच पक्षात नसल्याने राष्ट्रवादीने फेकलेले आरोपांचे दगड हे साहजिकच त्यांच्याच काचेच्या घरावर पडले आहेत.

या आरोप सत्रामुळे सध्या राजकारणाचा पेंडुलम हलता आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या राष्ट्रवादीला सोबत घेत काँग्रेसने आंबेडकरांची आघाडीसाठी मनधरणी करून त्यांना मनवले, तर याच नेत्यांची मोठी अडचण होणार आहे. आज एमेकांवर दगडफेक करणाऱ्यांनाच उद्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू ‘मतां’च्या माळा म्हणत गळाभेट घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू अन् मित्र असत नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस