शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळायला हवा", पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याचे गुलाबराव पाटलांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 17:41 IST

Pankaja Munde : जळगाव तालुक्यातील किनोद येथे शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित दिली. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

जळगाव : राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळायला हवा, अशी समाजाची रास्त अपेक्षा आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागतच आहे. त्‍यांना आमच्याकडे स्‍थान व सन्‍मान मिळेल, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहनच केले आहे.

जळगाव तालुक्यातील किनोद येथे शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित दिली. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सध्या भाजपच्‍या नेत्‍या पंकजा मुंडे यांच्‍या समर्थकांनी त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले.

मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडतीच्‍या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट दिले नव्‍हते. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्‍चीकरण केले जात असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

त्यांच्या पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणारपंकजा मुंडे यांना योग्‍य स्‍थान व प्रतिनिधित्‍व शिवसेनेत मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे, हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. ते सांगण्यासाठी मी एवढा मोठा नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPoliticsराजकारण