शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur Election Results Live : पंढरपुरात भाजपाचे ‘समाधान’, विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अवताडे म्हणाले, हा विजय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:21 IST

Pandharpur Election Results News : अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंढरपूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. (Pandharpur Election Results )अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी हा विजय जनतेला समर्पिक केला आहे. (This victory belongs to the people, Samadhan Avtade's reaction after the victory)

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी घोषित करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाधान अवताडे  म्हणाले की, या निवडणुकीत लोकांची तादक आमच्या पाठीशी होती. हा विजय जनतेचा आहे. निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीकडून जनतेवर दबाव होता. महाविकास आघाडीने अनेक गोष्टींचा वापर केल्याने माझे मताधिक्य कमी झालं आहे, असेही अवताडे यांनी सांगितले. 

दरम्यान पंढरपूरच्या तुलनेत मंगळवेढ्यामधून कमी मताधिक्य मिळालं का, असं विचारलं असता दोन्ही तालुक्यांमधून आपल्याला मताधिक्य मिळाल्याचे सांगितले. तसेच या विजयामागे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे अवताडे यांनी सांगितले. 

आता पंढरपूरप्रमाणेच महाराष्ट्रातही करेक्ट कार्यक्रम होणार का, असे विचारले असता याबाबत देवेंद्र फडणवीसच उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले. आमदार म्हणून काम करताना पाणी आणि रोजगाराचे मुद्दे प्राधान्याने हाताळले जातील. ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे समाधान अवताडे यांनी सांगितले.  

टॅग्स :pandharpur-acपंढरपूरPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021BJPभाजपाPoliticsराजकारण