शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:23 IST

अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत

चेन्नई : अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला केला.येथे रविवारी प्रचारसभेत बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवून शांतपणे त्यांंना आपल्या पाया पडायला लावतात हे मी पाहिले. मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही.” उत्तर प्रदेशमध्ये नेत्याला अमित शहा यांच्यासमोर वाकायला लावले कारण तो नेता भ्रष्ट होता आणि भ्रष्टाचारामुळे त्याने स्वातंत्र्य गमावले होते. अशाच परिस्थितीला पलानीस्वामी यांनी तोंड दिले, असा दावा गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशमधील नेत्याचे नाव गांधी यांनी घेतले नाही. गांधी म्हणाले, “शोकांतिका ही आहे की, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांच्यासमोर वाकावे, असे वाटत नाही आणि तामिळनाडूच्या कोणत्याही व्यक्तिला असेच वाटते. तथापि, पलानीस्वामी यांनी जो भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांना शहा यांच्यापुढे वाकणे भाग पडले.” तामिळनाडूच्या जनतेचा जो पैसा पलानीस्वामी यांनी चोरला त्यामुळे ते आता सापळ्यात अडकले आहेत, असे गांधी म्हणाले. महान तमिळ संस्कृतीशी नाळ जोडलेले पलानीस्वामी जेव्हा मोदी आणि शहा यांच्यासमोर वाकताना पाहिले तेव्हा मला संताप आला, असेही गांधी म्हणाले. मोदी आणि शहा यांच्या पाया पडा आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा मग ती व्यक्ती भाजपची असो किंवा आघाडीतील इतर पक्षांची भाजपला या नात्याशिवाय दुसरे नातेच समजले नाही, असा दावा गांधी यांनी केला. ते म्हणाले, आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आमच्यासाठी जे नाते समान नाही ते निरूपयोगी आहे. भारताच्या पायाचा भाग तामिळनाडू असल्याचे सांगून गांधी यांनी तमिळ भाषा शिकण्याची माझी इच्छा आहे, असे म्हटले. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१