चौथ्या टप्प्यातील ३२३ पैकी १०९ उमेदवार कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:40 AM2019-04-25T05:40:23+5:302019-04-25T05:40:46+5:30

‘वंचित’चे संजय भोसले सर्वांत श्रीमंत

Out of 323 candidates out of 323 candidates in fourth phase, | चौथ्या टप्प्यातील ३२३ पैकी १०९ उमेदवार कोट्यधीश

चौथ्या टप्प्यातील ३२३ पैकी १०९ उमेदवार कोट्यधीश

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघात येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होत असून निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ३२३ पैकी तब्बल १०९ उमेदवार कोट्यधीश आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवित असलेले वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांची एकूण संपत्ती १२५ कोटींहून अधिक आहे.

निवडणूक आयोगाकडे उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक्स रिफॉर्म्स या संस्थेने केले असून त्यांच्या अहवालानुसार चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघात कोट्यधीश उमेदवारांची संख्या अधिक आहे. पक्षनिहाय उमेदवारांची सरासरी मालमत्ता पाहिली असता काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ४०.२ कोटी असून राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व सात उमेदवार कोट्यधीश आहेत.

६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे
३२३ पैकी ८९ उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गन्ुहेगारी प्रकरणे दाखल असल्याचे नमूद केले असून त्यापैकी ६४ जणांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडे सरासरी २१.०९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
भाजपच्या ७ उमेदवारांकडे १७.२३ कोटी, शिवसेनेच्या १० उमेदवारांकडे २०.१४ कोटी
वंचित बहुजन आघाडीच्या १७ उमेदवारांकडे ९.८७ कोटी, तर बहुजन समाज पक्षाच्या १५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता १.२२ कोटी एवढी आहे.
शिवसेनेचे श्रीरंग बारणे (मावळ) यांच्याकडे १०२ कोटींची संपत्ती आहे.
दोन उमेदवारांकडे शुन्य संपत्ती असल्याचे घोषित केले आहे.
२८ उमेदवारांनी उत्पन्नाचा स्त्रोत घोषित केलेला नाही.

५० उमेदवार दहावी
चौथ्या टप्प्यातील ३२३ उमेदवारांपैकी १६२ जणांची शैक्षणिक पात्रता ५ वी ते १२, १३१ उमेदवार पदवी ते डॉक्टरेट असून तिघेजण अशिक्षित आहेत.

दोन उमेदवारांनी त्यांच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांनी त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे घोषित केले आहे.

Web Title: Out of 323 candidates out of 323 candidates in fourth phase,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.