शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

खळबळजक Video! नितिशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदाफेक

By हेमंत बावकर | Updated: November 3, 2020 16:39 IST

Bihar Election: याआधी मुजफ्फरपुर सकरामध्ये नितिशकुमारांच्या हेलिकॉप्टरकडे कोणीतरी चप्पल फेकली होती. ही चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही.

बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. याचवेळी तिसऱ्य़ा टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर भाषणाला उभे राहताच कांदा फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला त्यांच्यावर दगडफेकल्याचे वृत्त आले होते. 

मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच समोरील गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे बोलायला लागले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले. सुरक्षारक्षकांनी जेव्हा कंदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले. त्याला सोडून द्या, काही दिवसांनी स्वत:च त्यांना समजेल, असे ते म्हणाले. 

Video: हे, घ्या २ हजार...१ नंबरच बटण, कमळ चिन्हावर मतदान करा; भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणावर बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. विरोधकांना पटले आहे की, ते मतदानातून आम्हाला हरवू शकत नाहीत, यामुळे ते अशाप्रकारच्या घटना घडवत आहेत. विरोधक पुन्हा तोच काळ परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हा हल्ला नितिशकुमारांवर झालेला जिवघेणा हल्ला आहे. ते तुम्हाला आवडो वा न आवडो मतांद्वारे सिद्ध होणार आहे. मात्र, हल्ला करून काय सांगू इच्छित आहात, हे बिहारची जनता पाहत आहे. 

याआधी मुजफ्फरपुर सकरामध्ये नितिशकुमारांच्या हेलिकॉप्टरकडे कोणीतरी चप्पल फेकली होती. ही चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही. तेव्हा मुख्यमंत्री नितिशकुमार मंचावर होते. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. चप्पल फेकताना काही लोक घोषणाबाजी करत होते. या व्यतिरिक्त नितिशकुमारांच्या रॅलीमध्ये मुर्दाबादची घोषणाबाजीही झालेली आहे. एलजेपी प्रमुख चिराग पासवान यांच्या दाव्यानुसार नितिशकुमार यांच्याविरोधात लोकांमध्ये राग आहे. भाजपाचे नेते दबक्या आवाजात हे कबूलही करत आहेत. 

भाजपकडून पैसेवाटप

गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. व्हिडिओमध्ये एक भाजपा कार्यकर्ता मतदान करण्यासाठी निघालेल्या लोकांना पैसे देताना दिसत आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर सीईओ डॉ. मुरलीकृष्ण यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराजसिंह परमार यांनी फिर्याद दिली आहे. व्हिडीओमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मत देण्यासाठी चाललेल्या मतदारांना पैसे देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कर्जन मतदारसंघातील मतदान केंद्रावरचा आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहार