- योगेश्वर माडगूळकर पिंपरी : २०१४ मध्ये झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत नोटाला १११८६ मते मिळाली होती. त्यापेक्षा तेरा उमेदवारांना मते कमी मिळाली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये १६,०३० नोटा मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी नोटा मतदानामध्ये ४८८४ मतांनी वाढ झाली होती.लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही नोटा मतदानाची आकडेवारी वाढली आहे. पनवेल, उरण वगळता सर्वच विधानसभा मदतदारसंघामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी २७१२ नोटा मतदान झाले होते. विधानसभेसाठी २६६६ नोटा मतदान झाले. कर्जत मतदार संघामध्ये नोटा १२२१ मतदान झाले होते. विधानसभेसाठी नोटा २५२१ मतदान झाले. उरणमध्ये नोटा १७८४ मतदान झाले होते.
मावळमध्ये तेरा जणांवर भारी पडले होते नोटाचे व्होट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:43 IST