शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

'मजबूर नव्हे तर मजबूत सरकार पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:11 IST

देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

वाडा : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे आयोजित केलेल्या महामेळाव्यात देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महायुतीच्या वाडा येथे झालेल्या पहिल्याच मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यासपीठावर उपस्थित नेत्यांच्या चेह-यावर नाराजीचा भाव दिसत होताभाजप, शिवसेना, रिपाई, श्रमजीवी संघटना व कुणबी सेना यांच्यावतीने भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा येथे महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याची वेळ प्रत्यक्ष सकाळी अकरा वाजता असताना दुपारी चार वाजता सुरू झाला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी भाजप शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवत आहे तर विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. वाडा एमएमआरडीए क्षेत्रात येत नसल्याने विकास खुंटला आहे. यापुढे वाडा एमएमआरडीए क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असे शिंदे यांनी स्पष्ट केले.खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, वाडाचा विकास करण्याचा वादा केला. मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या चांगल्या कामामुळे या निवडणुकीत भ्रष्टाचार व महागाईचा मुद्दा नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार असून मी खासदार झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता खासदार असेल या भावनेने काम करेल असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीच्या दुष्काळामुळे आयोजक आणि नेते एकमेकाचे तोंड चुकवत होते.>अल्प प्रतिसाद, एकनाथराव विसरले कपिल पाटलांची निशाणी : मेळाव्यामध्ये निम्याहुन अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याने मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. या मेळाव्यात गर्दी दिसावी म्हणून अल्पवयीन मुलांना सहभागी केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना कपिल पाटील यांच्या धनुष्यबान या निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी धनुष्यबाण, धनुष्यबाण असा तीन वेळा निशाणीचा नामोउल्लेख केल्यानंतर उमेदवार कपिल पाटील यांनी कमळ निशाणी असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर शिंदे यांची चूक लक्षात आली.>नगरसेवकांचा बहिष्कार : या मेळाव्याला वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता.>शिवसेनेच्या वाघांनी मारला रामनवमीला चिकन बिर्याणीवर ताव : वाडा येथे महायुतीच्या मेळावा शनिवारी रामनवमी या दिवशी आयोजित केला होता. या महामेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यासाठी भोजनासाठी चिकन बिर्याणी ची व्यवस्था केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये रामाच्या नावाने मते मागणारे रामनवमीच्या दिवशी चिकन बिर्याणीवर ताव मारत होते. अशी खंत प्रामाणिक कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhiwandi-pcभिवंडी