शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:51 IST

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे.

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतविधान परिषद निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला. तिकिटे नेत्यांनी वाटली की वाटून घेतली हा प्रश्नच आहे. नागपूर, पुण्याची जहागिरी वाटून घेण्याच्या नादात इलेक्टिव्ह मेरीट असलेले उमेदवार दिले गेले नाहीत. ते दिले असते तर चित्र वेगळे राहिले असते. गोविंदाचे एक गाणे होते, मै चाहे ये करू, चाहे वो करू, मेरी मर्जी.. भाजपमध्ये सध्या तसे चालले आहे. पक्षातील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत. कोरसमध्ये कोणीही गात नाही. भावगीताला डिस्कोचे संगीत दिले तर ते बेसूर होणारच. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे वादग्रस्त विधाने करण्याचे थांबलेले नाहीत. रामदास कदम यांनी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. त्यावेळी कदम हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. 

कल्याणच्या सभेत फडणविसांनी सुनावले,  'भाई तुमचा पगार किती अन‌् तुम्ही बोलता किती?'. भाजपमधील काही नेत्यांनादेखील हे सांगण्याची आवश्यकता आहे. आपण एकटेच बोलण्यात प्रवीण आहोत असे दरेकरांना वाटते, पण त्यांच्यामुळे पक्षाला किती फायदा झाला याचा अभ्यास केला पाहिजे. सुमार नेत्यांची सद्दी संपली पाहिजे किंवा त्यांना आवर तरी घातला पाहिजे. प्रसाद लाड यांच्यासारखी माणसे भाजपचं तत्वज्ञान सांगू लागतात तेव्हा आंब्याच्या झाडाला लिंबू लागल्यासारखे वाटते.विधानपरिषद निवडणुकीत भाजपमध्ये जे काही अंतर्गत वाद, एकमेकांना फटाके लावणे, राजीनाराजी असे प्रकार घडले त्याचा हिशेब केला तर आत्मचिंतनाला भरपूर संधी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची परवा जयंती झाली. भटाब्राह्मणांचा पक्ष ओबीसीपर्यंत नेणारा हा नेता होता. मुंडे-महाजन हे सत्तेशिवाय मोठे होते. सत्तेत कोणीही मोठे असते. ती गेल्यानंतरही मोठेपण, दबदबा, दरारा तसाच कायम राहिला तर ते नेतृत्वाचे खरे यश असते. भाजपमध्ये फडणवीस, मुनगंटीवार, पंकजा मुंडे असे ताकदीचे नेते आहेत, पण एकीचा आणि संवादाचा अभाव दिसतो. भाजपचे १०५ आमदार आहेत. 
अनेक महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये आजही भारतीय जनात पक्षाची सत्ता आहे. पक्षाचे केंद्रात सरकार आहे. फडणवीस यांच्यासारखा हेडऑन घेऊ शकणारा नेता आहे. संपूर्ण विरोधी पक्षाची स्पेस आज भाजपकडे आहे, असे असूनसुद्धा भाजप विरोधी पक्षाच्या मन:स्थितीत पूर्णतः गेलेला दिसत नाही. ऑपरेशन लोटस हा शब्द आतापर्यंत खूप वेळा वापरला गेला आहे. महाराष्ट्रात 'ऑपरेशन विदिन लोटस' करण्याची गरज आहे हे निश्चीत.
ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र!विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सत्तेतील तिन्ही पक्ष ही लढत झाली आणि त्यात महाविकास आघाडीने बाजी मारली. आता राज्यातील १४२५८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीतही अशीच लढत राहिली तर ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असेल. भाजपची कसोटी लागेल. ग्रामीण महाराष्ट्रावर पकड कोणाची याचा फैसला यानिमित्ताने होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला अमरावतीत दगाफटका झाला. ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल असे दिसते.पवारसाहेब, शंकरबाबा, अनिल देशमुखांचे कन्यादानअमरावती जिल्ह्याच्या वझ्झरमध्ये शंकरबाबा पापळकर नावाचा एक अवलिया राहतो.  अनेक अनाथ मुलामुलींची लग्न त्यांनी लावून दिली. त्यांच्या २४ व्या मानसकन्येचा म्हणजे अनाथ वर्षा या तरुणीचा विवाह त्यांच्याच संस्थेतील समीर या अनाथ तरुणाशी २० डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे गृहमंत्री आणि देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आरती देशमुख वर्षाचे कन्यादान करणार आहेत. अनिल देशमुख यांच्या घरी हे लग्न होणार आहे. शंकरबाबांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी मुंबईत आपल्या घरी बोलावले. अनिलबाबू त्यांना घेऊन गेले. पवार साहेबांनी तासभर चर्चा, विचारपूस केली. अनाथांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा त्यांनी शंकरबाबांकडून ऐकून घेतल्या. तुमच्या संस्थेत नक्की येईन असे ते म्हणाले. संत गाडगेबाबांची परंपरा आपल्या लोकसेवेतून चालविणारे शंकरबाबा भारावून गेले.yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलpravin darekarप्रवीण दरेकरPankaja Mundeपंकजा मुंडेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा