शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

माढ्याचा तिढा सुटणार? राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 12:09 IST

आज संध्याकाळी शरद पवारांकडून शिंदेंचं नाव जाहीर होण्याची शक्यता

सोलापूर: रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश, शरद पवारांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाच्या मदतीनं सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिंदे आज राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. सुरुवातीला माढ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव चर्चेत होतं. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं शरद पवार यांनी माघार घेतली. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी नको, असं म्हणत पवारांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचं प्रतिनिधीत्व करतात. विजयसिंह यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र उमेदवारी मिळण्याची फारशी शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये गेल्यानं राष्ट्रवादी माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा होती. मात्र आज हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार आज संध्याकाळी बारामतीमधल्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. यामध्ये संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. संजय शिंदे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे लहान भाऊ आहेत. संजय शिंदे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार