"माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे देशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये सांगत होते परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे?, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आज देशात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं १०० रूपयांचा टप्पा पार केला आहे यावरून नबाव मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. "जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे," अशी मागणीही नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती. इंधन दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे अशा आशयाचे ट्वीट केलं. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर हल्लाबोल केला आहे.
'पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली, आता कुणाचं नशीब'; राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 12:14 IST
Petrol Diesel Price hike : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरानं गाठलाय १०० रूपयांचा टप्पा. राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या २०१५ च्या 'त्या' वक्तव्याची आठवण.
'पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली, आता कुणाचं नशीब'; राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण
ठळक मुद्देसध्या देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरानं गाठलाय १०० रूपयांचा टप्पा.राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या २०१५ च्या 'त्या' वक्तव्याची आठवण.