शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सत्तेत येऊ नका, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 12:17 IST

सत्तेत आल्यास चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देणार म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

नांदेड- सत्तेत आल्यास चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देणार असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तो प्रश्न सोडवतो अशा शब्दात जलसंपदा मंत्री  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला.राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त रविवारी नांदेडात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, फडणवीस म्हणतात सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार. म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. परंतु त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालविण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा. फडणवीसांनी ओबींसीचे नेतृत्व घ्यावे असा सल्ला भूजबळांनी दिला आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपाला आणि फडणवीसांना ऐवढाच कळवळा असता तर भूजबळांना एवढे वर्ष तुरुंगात खितपत ठेवले नसते. त्यांचे त्या काळात अतोनात हाल केले. एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केले. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणे हे हास्यापद असल्याची टिका पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जयसिंगराव गायकवाड, डॉ.सुनिल कदम यांची उपस्थिती होती.सीबीआय, ईडी आणि आता आरबीआयचा वापरमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने आतापर्यंत सीबीआय, ईडी आणि आरबीयआयचा वापर करणे सुरु केले आहे. आरबीआयने सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे चांगल्या चालत असलेल्या संस्था बंद करण्याचा हा उद्योग आहे. असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.आंदोलने करु नयेतडेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. काँग्रेसकडून ओबीसीसाठी आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी गर्दी होत आहे. या विषयावर पाटील म्हणाले, डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे यापुढे कुणीही अशाप्रकारची आंदोलन करु नयेत असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षण