शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 14:18 IST

खरे मोदी कोण? भुजबळांनी केला सवाल

ठळक मुद्देखरे मोदी कोण? भुजबळांनी केला सवालआपल्या देशाला आंदोलने नवीन नाहीत, भुजबळ यांचं वक्तव्य

"आंदोलनजीवी अशा पद्धनतीने कोणाला हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो," अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जनता दरबार उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला."आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं, कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली," असेही भुजबळ यावेळी म्हणाले.लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.खरे मोदी कोण?"आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलं आहे की, मोदी गहिवरलेसुद्धा. त्यामुळे नक्की हे खरे की ते खरे, हे मोदींनाच विचारायला हवे की खरे मोदी कोण? असा खोचक टोला भुजबळ यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना लगावला आहे. "पंतप्रधाननरेंद्र मोदी शरद पवार यांच्यावर टीका पण करतात. यु टर्न केल्याचेही बोलतात आणि युतीसुद्धा करतात," असेही छगन भुजबळ म्हणाले.काय म्हणाले होते मोदी ?आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात उदयास आली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत केली होती. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला होता.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप