शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ राज्यातील आणखी एका खासदाराचं अमित शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:19 IST

Navneet Rana demands president rule in Maharashtra: खासदार नवनीत कौर राणा यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे. (mp navneet rana demands president rule in Maharashtra)मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख राणा यांनी पत्रात केला आहे. 'अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तीच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती,' असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.या संपूर्ण प्रकरणात हिरेन यांची चौकशी करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरेन यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीदेखील केली होती. मात्र त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, असा संपूर्ण घटनाक्रम नवनीत राणा यांनी पत्रात नमूद केला आहे.

राज्यात सगळेच असुरक्षित; राष्ट्रपती राजवट लागू कराअंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं योगदान मोठं आहे. देशातील हजारो तरुणांना ते रोजगार देतात. एवढ्या मोठ्या उद्योगपतीला धमकी मिळते. त्यावरून उद्योगपतींसह सामान्य लोकांचं रक्षण करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाNarayan Raneनारायण राणे Mansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी