शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

Cabinet reshuffle: मोदींनी घेतला महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा राजीनामा; दुसरे तातडीने दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 14:53 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle, Raosaheb Danve resign?: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांचा समावेश आहे.

Modi Cabinet Expansion: मोदी कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली असून केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह पाच ते सहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंचाही (Sanjay Dhotre) समावेश आहे. याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडेदेखील राजीनामा मागितल्याची चर्चा असून ते तातडीने दिल्लीला निघाले आहेत.   (central ministers Sanjay Dhotre resigned from the modi Cabinet; Raosaheb Danve in Flight on the way of Delhi )

Cabinet reshuffle: मोदींकडून मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात; रमेश पोखरियाल निशंकांसह चौघांना मंत्रिमंडळातून वगळले

रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. तर दुसरे मंत्री पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांच्याकडे देखील राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांच्या जागी पश्चिम बंगालच्याच नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोघांनंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौड़ा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राज्य मंत्री संतोष गंगवार यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. 

Cabinet reshuffle: नितेश राणे दिल्लीत, नारायण राणे मोदींच्या भेटीला; दिल्लीत हालचालींना वेग

काल एका मंत्र्याला राज्यपालपद...पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल (Governor) बनविण्यात आले आहे. 

राज्याच्या राजकारणात उडाली खळबळमहाराष्ट्रातील भाजपाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याने आता त्यांच्या जागी महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना स्थान मिळणार की अन्य कोणत्या नेत्याला हे मंत्रिपद जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. अकोल्यातील खासदार संजय धोत्रे मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर रावसाहेब दानवे यांच्याकडे  ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवेंकडे राजीनामा मागितला (Raosaheb Danve resign?)  की त्यांची बढती होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे सुत्रांनी सांगितले. 

सर्व नेते दिल्लीतमिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जाेशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डाॅ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद साेनाेवाल यांच्यासह सुशील माेदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव,  दिलीप घाेष या भाजप नेत्यांना तसेच  लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील, भागवत कराड  दिल्लीत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारraosaheb danveरावसाहेब दानवेSanjay Dhotreसंजय धोत्रे