शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाईल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी लिहितात, आमच्या सरकारनं कौटुंबिकतंत्रापेक्षा प्रामाणिकपणाला निवडलं. संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदीचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं साधन समजलं.  2014मध्ये जनतेनं भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्यासह चांगल्या भविष्यासाठी मतदान केलं.एनडीए सरकार ‘Family First’ ऐवजी ‘India First’ या भावनेनं काम करतं. काँग्रेसवर मोदींनी वंशवादाचा आरोप केला आहे. काँग्रेसनं देशाच्या संस्थांना कमकुवत केलं आहे. मोदींनी यावेळी जनतेसाठी राबवलेल्या योजनांचाही उल्लेख केला आहे. मोदी म्हणाले, स्वच्छता 2014मध्ये फक्त 38 टक्के होती, पण आता ती वाढून 98 टक्के झाली आहे. तसेच थेट फायदा, कर्ज मिळण्याची सुलभ प्रक्रिया, पछाडलेल्या वर्गांसाठी चालवलेल्या योजनांचाही हवाला दिला आहे.आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. एखादी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट तुरुंगात टाकण्याचा कायदा काँग्रेसनं आणला होता, आणीबाणी लावून काँग्रेसनं संविधान आणि न्यायालयांचा अवमान केला होता. यूपीए सरकारनं सीबीआय, आयबी आणि रॉ सारख्या गुप्तचर संस्थांचा वेळोवेळी दुरुपयोग केला. मोदी यांनी योजना आयोगावरही टीका केली आङे. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी योजना आयोगाला A bunch of jokers म्हणजेच जोकरांचा समूह असं म्हटलं होतं. त्यावेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मनमोहन सिंग होते. काँग्रेस सरकार संस्थांबाबत काय विचार करते, हे यावरून स्पष्ट होत आहे.काँग्रेसनं लष्कराला नेहमीच कमाईचं एक साधन समजलं. त्यामुळेच जवानांना काँग्रेसनं कधीही सन्मान दिला नाही. ज्याचे ते पात्र आहेत. पुलवामा हल्ल्यावर मोदी म्हणतात, आमचं हवाई दल दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत, पण काँग्रेस त्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मोदींनी एकंदरीतच त्यांच्या ब्लॉगमधून काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक