शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरणाआधी दलदलीतील स्मारकाची अवस्था बदलावी, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:24 IST

Narayan Rane : जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा प्रयत्न करा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मनं शुद्ध करा व मग कारभार करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला फटकारले.

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाची अवस्था आधी पाहा. तिथे सगळी दलदल आहे, पॅंट वर करून तिथे पोहोचावे लागते. बाळासाहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा प्रयत्न करा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मनं शुद्ध करा व मग कारभार करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला फटकारले.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यानंतर सायंकाळी शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणाचा घाट घातला. यावर शुक्रवारी राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ज्यांना गोमूत्र शिंपडायचे त्यांना शिंपडू द्या. काय दूषित झाले होते हे त्यांनाच विचारा, असे म्हणतानाच कोणत्याही दैवताचे स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करू नये, भावनांचा विचार करावा. मांजरीसारखे आडवे येऊ नये. ज्यांना स्वातंत्र्याचा अमृत की हिरक महोत्सव माहीत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी खोचक टीकाही राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आम्ही वर आहोत...जनआशीर्वाद रॅलीतील अनेकांवर राज्य सरकार गुन्हे दाखल करत आहे. यासंदर्भात राणे म्हणाले की, सात नव्हे ७० हजार गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही. ज्यांच्यावर गुन्हे झाले त्यांच्या पाठीशी उभा राहायला मी समर्थ आहे. मात्र, सरकारची ही वृत्ती चुकीची आहे. तुम्ही बैठका घेतल्या, सभा घेतल्या तेव्हा कोरोना नाही झाला का, असा प्रश्न करतानाच तुमच्या डोक्यावर कोणी तरी दिल्लीत बसले आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात, असा इशाराही राणे यांनी दिला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना