शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Narayan Rane: केंद्रीय मंत्रिपदावर असताना नारायण राणेंना अटक होऊ शकते का? कायदा काय सांगतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:24 IST

Narayan Rane News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदावर असताना नारायण राणे यांना अटक होऊ शकते का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. ( Can Narayan Rane be arrested while he is a Union Minister? What the law says)

नारायण राणे यांना अटक होऊ शकते का याबाबत कायदेतज्ज्ञांना विचारले असता त्यांनी नारायण राणे यांना अटक होऊ शकते, असे मत मांडले आहे. मात्र ते अटकपूर्व जामीन घेऊन ते अटक टाळू शकतात, असा मुद्दाही कायदेतज्ज्ञांनी मांडला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी नारायण राणेंवर भादंवि कलम ५००, ५०५(२), १५३(ब) १ आणि (क) अशी कलमे लावली आहेत. दरम्यान, नारायण राणेंविरोधात लावलेले कलम ५०० हे चुकीचे आहे. ज्या व्यक्तीची बदनामी होते. तीच व्यक्ती अशा प्रकारची तक्रार करू शकते. येथे उद्धव ठाकरे यांनी तक्रार केली तरच हे कलम लागू शकते, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. 

राणेंविरोधात दाखल झालेला गुन्हा दखलपात्र असला तरी त्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे पोलीस येण्यापूर्वी नारायण राणे अटकपूर्व जामीन मिळवू शकतात. यामध्ये त्यांना पोलिसांनी लावलेल्या कलम ५०० चा फायदा होऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे एखादे चुकीचे कलम लावले गेले, तर इतर कलमांबाबतही संशय निर्माण होऊ शकतो, अशी माहितीही सरोदे यांनी दिली.  

दरम्यान, दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण