नवी दिल्ली - पॉवर ग्रिड फेल झाल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरामधील वीजपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला होता. आता काही भागातील वीज आली असली तरी वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेला नाही. दरम्यान, आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.जेव्हा नरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेत, आता या मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का? असा सवाल अमित मालविय यांनी विचारला आहे.
Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल
By बाळकृष्ण परब | Updated: October 12, 2020 14:10 IST
mumbai electricity news : आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल
ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेतया मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का?आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता