शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

"अभिषेक बॅनर्जींनी धक्का देऊन रॉय यांना बाहेर काढलं, आता चाऊमिन खायला पुन्हा तृणमूलमध्ये गेले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 19:34 IST

Mukul Roy Joins TMC West Bengal: मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावरून भाजपची टीका. भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला देत असल्याचा भाजपचा आरोप.

ठळक मुद्देमुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावरून भाजपची टीका. भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला देत असल्याचा भाजपचा आरोप.

 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असलेल्या मुकुल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा त्यांचं स्वागत केलं. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata) परंतु यानंतर भाजपनं मात्र मुकुल रॉय यांच्यावर जोरदार टीका केली. 

भाजप पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी मुकुल रॉय यांच्या आरोप करत ते भाजपच्या अंतर्गत सूचना तृणमूल काँग्रेसपर्यंत पोहोचवत असल्याचं म्हटलं. तसंच यामुळे भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. "ते पहिल्यांदा भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक जिंकले होते. जाण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं," असंही त्यांनी नमूद केलं. "राजकारणात सोयीस्कर भूमिका घेणारी लोकंही असतात. तेच अशी कामं करतात. जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं वर्चस्व वाढलं तेव्हा त्यांच्यासोबत रॉय यांची शाब्दीक चकमक झाली. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना धक्का देऊन घराच्या बाहेर काढलं होतं," असं सिंह म्हणाले.पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले"त्या प्रकरणानंतर ते भाजपत आले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले. चाऊमिन खाऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले, नंतर पुन्हा भाजपत आले," असं म्हणत सिंग यांनी मुकुल रॉय यांच्यावर निशाणा साधला. "त्यांची आयाराम गयाराम सारखी कहाणी आहे. ज्या ठिकाणी सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी ते राहतील. पहिल्यांदा त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती. त्यांना जायचं होतं तर त्यांनी किमान राजीनामा देऊन जायचं होतं. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किमान आदर तरी राहिला असता," असंही त्यांनी नमूद केलं.जनतेचे नेते नाही"मुकुल रॉय हे कधीही जनतेचे नेते नव्हते. पश्चिम बंगालमध्ये एसी रूममध्ये बसून राजकारण होऊ शकत नाही. राजकारणातील त्यांची वेळ ही आता संपली आहे. त्यांच्यावर कोणीही आता विश्वास करत नाही. भाजपचीं अंतर्गत माहिती ते टीएमसीला देत होते हे सर्वांना माहित होतं. जर विरोधकाला तुमच्या सर्व योजना माहित असतील तर ते पराभवाचं कारण बनतं," असंही सिंह म्हणाले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा