शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 15:31 IST

mukesh ambani security scare: भाजपच्या रडारवर शिवसेना; वाझेंचा बचाव कशासाठी केला जातोय? राम कदमांचा सवाल

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा (mukesh ambani security scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. यावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष सुरू झाला आहे. भाजपनं या प्रकरणात शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र एनआयएनं त्यांना अटक केली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंची पाठराखण केली होती. आता वाझेंच्या अटकेनंतर भाजपनं शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. 'अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत? वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का?', असे प्रश्न कदम यांनी विचारले आहेत.'महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करतंय का? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का? या दृष्टीनं तपास व्हावा अशी आमची मागणी आहे,' असं राम कदम यांनी म्हटलं. 'कोट्यवधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं कारण काय? एक साधारण एपीआय दर्जाचा अधिकारी इतकं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का?' असे सवाल कदम यांनी उपस्थित केले आहेत.

टॅग्स :Ram Kadamराम कदमMukesh Ambaniमुकेश अंबानीsachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना