शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 13:26 IST

Congress MP Kumar Ketkar raised issue of Mukesh Ambani Bomb Scare in Rajyasabha: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे.

ठळक मुद्देज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाहीजिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचेकाँग्रेस खासदार कुमार केतकर यांचा राज्यसभेत दावा

नवी दिल्ली – संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे, या अधिवेशनात महाराष्ट्रातील वाझे प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, मात्र हे जिलेटिन कुठून आले आणि कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न केतकरांनी राज्यसभेत उपस्थित केला.( Who supplied gelatin? & what purpose, Congress MP Kumar ketkar asked question in Rajyasabha over Sachin Vaze Case)  

याबाबत कुमार केतकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात २ प्रकरण गाजत आहेत, त्यात स्थानिक पोलीस आणि NIA तपास करत आहेत, एक म्हणजे लोकसभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली, डेलकर हे ७ वेळा खासदार राहिले होते, त्यांच्या सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे मोहन डेलकरांनी मुंबईत आत्महत्या केली कारण त्याचं दीव-दमण आणि इतर राज्यातील सरकारवर विश्वास नव्हता असं त्यांनी सांगितलं.

सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट

तसेच दुसरी घटना मनसुख हिरेन यांचा मृत्यू...प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचे आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली.

सचिन वाझेंच्या ठाण्यातील घराची झडती

NIA ने ठाण्यातील साकेत सोसायटीत राहणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निवासस्थानाची बुधवारी झडती घेतली. त्यांच्या पत्नी मोहिनी वाझे यांच्याकडे चार ते पाच तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाझेंच्या मर्सिडीज बेन्झमध्ये सापडलेली पाच लाखांपेक्षा अधिक रोकड, इतर सामग्रीबाबत त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकाने बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ठाण्यातील साकेत येथील बी-६ इमारतीमधील वाझेंच्या घरात झडती घेतली. मनसुख हिरेन आणि वाझे यांचे कसे संबंध होते? मनसुख यांच्या हत्येपूर्वी ते साकेत सोसायटीत आले होते का? वाझेंबरोबर काही वाद झाला होता का? अशा अनेक बाजूंनी वाझेंच्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे समजते. चार तासांची घरझडती,  कागदपत्रे पडताळणी, चौकशीनंतर तेथे राबोडी पोलिसांना बोलावले. सोसायटीतील काही रहिवाशांकडेही चौकशी केली.(NIA Investigation in Sachin Vaze Case)  

वाझे यांनी हा कट कोणाच्या सांगण्यावरून रचला, त्यांना २५ फेब्रुवारीला या तपासाचे अधिकार कोणी दिले, याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, सीआययूच्या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी साहाय्यक निरीक्षक रियाजुद्दीन काझी व प्रशांत होवाळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. वाझेंच्या सांगण्यावरून  अंबानींच्या घराच्या परिसरात स्कॉर्पिओ ठेवणे, इनोव्हातून प्रवास करणे, याबाबत विचारणा केली जात आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानीcongressकाँग्रेसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा