शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 09:55 IST

West Bengal politics: राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणूक जससशी जवळ येऊ लागली आहे तसतसे तेथील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. यामुळे तृणमूलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणींत वाढ होऊ लागली आहे. राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. 

फेसबुक पोस्टवर व्यक्त होत रॉय यांनी पक्षातील काही नेते त्यांना कमी लेखू लागले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय भविष्यावर त्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून यासाठी त्यांनी शनिवारी, 16 जानेवारी दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. शताब्दी यांनी म्हटले की, लोक त्यांना विचारतात की पक्षाच्या बीरभूममधील कार्यक्रमांना का येत नाही. मी कशी सहभागी होऊ, जर मला त्यांचे शेड्यूलच माहिती होत नाही. मला वाटते काही लोकांना मी तिथे असावे असे वाटत नाही. 

टीएमसीच्या सुत्रांनुसान 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शताब्दी रॉय फार कमी कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. लोकांनी त्यांना शेवटचे 28 डिसेंबरला पाहिले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बीरभूमच्या रॅलीमध्ये त्या आल्या होत्या. ममता यांनी या रॅलीमध्ये त्यांना महत्व दिले होते. तसेच रॅलीमध्ये त्यांचे नावही घेतले होते. 

स्थानिक नेते का नाराज?शताब्दी रॉय यांनी खासदार निधी लोकांमध्ये विकासकामांसाठी परस्पर वाटला होता. यामुळे स्थानिक नेते नाराज होते. शताब्दी यांनी असे करताना स्थानिक नेत्यांचे मत घेतले नाही. यामुळे त्यांना बाजुला ठेवण्यास सुरुवात झाली आहे. 

2009 पासून खासदारशताब्दी रॉय या 2009 पासून टीएमसीच्या खासदार आहेत. बीरभूममधून त्यांनी निवडणूक लढविली होती. यानंतर त्या 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढविली होती. बंगाली फिल्मसिटीच्या त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल