शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मोदी-ठाकरेंच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकारणही ढवळून निघाले; तर्कांना उधाण, दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले, भेटीत गैर काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 06:42 IST

Modi-Thackeray : ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नवी दिल्लीतील पंचेचाळीस मिनिटांच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत नेमके काय बोलणे झाले असेल या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत बेबनाव झाला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकार तयार केले.

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ही एकांतातील भेट चर्चेचा विषय ठरली आहे. सरकारला कोणताही धोका नाही असे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सातत्याने सांगत आले आहेत. तथापि, भाजप-शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र येण्यासंदर्भात मोदी-ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असावी, असा तर्क देण्यात येत आहे. त्यातच या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

‘आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही पण याचा  अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काहीही चुकीचे नाही. मी काही नवाझ शरिफना भेटायला गेलो नव्हतो. मोदींना भेटण्यात काहीही गैर नाही’, असे सूचक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत. या वक्तव्यातून उद्या भाजप-शिवसेनेची युती लगेच होईल असा तर्क काढणे राजकीय अपरिपक्वपणा ठरेल, पण भाजप आणि मोदींशी कटुतेचे संबंध संपावेत, अशी ठाकरे यांची इच्छा असल्याचे त्यातून प्रतीत होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुना मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेला मोदी यांनी आज ठाकरेंबरोबरच्या भेटीत नेमकी काय साद घातली, हे पुढील काळातील संभाव्य राजकीय घटनांवरूनच स्पष्ट होईल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत काहीही गैर नाही. मुख्यमंत्री हे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटतात तेव्हा नंतर स्वतंत्रपणे भेटतात, असा प्रघात आहे. त्यानुसार दोघांची भेट झाली असावी, असे मत व्यक्त केले.

‘सत्तांतराची नांदी’मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची दिल्लीत घेतलेली भेट ही राजकीय तडजोडीसाठी असून, भविष्यात देवाणघेवाणीतून सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा सुरू झाली, त्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांच्याशी नंतर फोनवर बोलेनच, असेही मोदी म्हणाले.

जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. चर्चा होते याचा अर्थ ती नक्कीच महत्त्वाची असणार. मुख्यमंत्री आधी अजित पवार आणि अशोक चव्हाणांसोबत आणि नंतर एकटे भेटले, या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.- खा. संजय राऊत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतंत्रपणे भेटल्याने भीती वाटण्याचे कारण नाही. या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे आणि ते पाच वर्षे ठीक टिकेल.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी

शिवसेनेशी आमचा संबंध तीस वर्षांपासूनचा आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची भेट घेतली यात गैर काहीही नाही. ‘शिवसेनेची भूमिका नेहमीच देव, देश अन् धर्मासाठी’ अशी राहिली. सध्या त्यांच्या विचारांचे अपहरण झाले एवढेच.- सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी