शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

मोदी सरकार पुढच्या तीन दिवसांत तीन वर्षांसाठीचा अजेंडा तयार करणार, अनेक मोठे निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:36 IST

Narendra Modi government: एकीकडे विरोधी पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मोदी आणि भाजपानेही या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे विरोधी पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मोदी आणि भाजपानेही या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये सरकारच्या पुढील तीन वर्षांसाठीच्या वाटचालीचा अजेंडा निश्चित केला  जाणार आहे. (The Modi government will formulate an agenda for three years in the next three days, many big decisions will be taken)

गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच काही मंत्रालयांची जबाबदारी बदलण्यात आली होती. आता मंत्र्यांची ही टीम पुढील आठवड्यात तीन दिवसांची बैठक आयोजित करणार आहे. मंगळवारी संध्याकाळी सुरू होणाऱ्या या बैठकीत पुढील तीन वर्षांतील वाटचालीवर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान सर्व मंत्रालयांच्य कामाचा आढावा घेतला जाईल. तसेच पुढील लक्ष्य निश्चित केले जाईल. याशिवाय नव्या मंत्र्यांना त्यांचे विभाग आणि मंत्रालयांसंदर्भात माहिती दिली जाईल.

गेल्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी आरोग्य, आयटी आणि पेट्रोलियमसह डझनभर मंत्रालयांमध्ये बदल केला होता. सरकारने पुढील काळात विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांची निवड केली आहे. पुढच्या वर्षी देशातील सात राज्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मोदींची आणि पक्षाची घसरलेली लोकप्रियता सावरण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. २०१९ मध्ये सत्तेवर पुन्हा आल्यावर मोदी सरकारने कलम ३७० हटवण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा