शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांनी दिला ‘पद्म’ पुरस्कारातून राजकीय संदेश, निवडणूक होणाऱ्या राज्यांना सिंहाचा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:49 IST

'Padma' award News : केंद्रातील सत्तेच्या ७व्या वर्षी २०२१ मध्ये मात्र त्यांनी सहापेक्षा अधिक राजकीय नेत्यांंना ‘पद्म’ पुरस्कारा देऊन त्यांनी मार्ग बदलल्याचे संकेत यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारातून मिळतात.

- हरीश गुप्तानवी दिल्ली :   ‘पद्म’ पुरस्कारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय संदेश दिला आहे. दिल्लीतील ‘ल्युटियन्स’मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना ‘पद्म’पुरस्काराने सन्मानित करण्याचा  आधीच्या सरकारच्या प्रथेऐवजी समाजाच्या विविध क्षेत्रांत समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या मान्यवर व्यक्तींना ‘पद्म’ पुरस्कार देण्याचा नवीन पायंड्यासाठी पंतप्रधान मोदी यांना ओळखले जाते;  परंतु, केंद्रातील सत्तेच्या ७व्या वर्षी २०२१ मध्ये मात्र त्यांनी सहापेक्षा अधिक राजकीय नेत्यांंना ‘पद्म’ पुरस्कारा देऊन त्यांनी मार्ग बदलल्याचे संकेत यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारातून मिळतात.भाजपचे दिवंगत नेते केशुभाई पटेल (गुजरात),  लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते राम विलास पासवान (बिहार) आणि काँग्रेसचे दिवंगत नेते तरुण गोगोई (आसाम) यांना मरणोत्तर ‘पद्म’पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हरियाणाचे आणि अकाली दलाचे (बादल) नेते  सरदार तरलोचन सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.  यातून पंतप्रधान मोदी मागच्या दरवाजाने अकाली दलाला पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्यासाठी किंवा अकाली दलाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने काम करीत असल्याचे संकेत मिळतात.  लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन (पद्मविभूषण), माजी केंद्रीयमंत्री बिजय चक्रवर्ती (पद्मश्री), गोव्यातील भाजप नेते आणि माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाही पद्मश्री देण्यात आला आहे. हे पाहता मोदी पंजाब, आसाम आणि बिहारमध्ये आपले राजकीय पाठबळ भक्कम करू पाहत आहेत.  तसेच पंतप्रधान मोदी यांनी  आपण सामूहिक नेते असल्याचे प्रतित केले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी