शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोरसह दोन आमदारांनी सोडला पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 21:01 IST

गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा आमदारांचा सिलसिला सुरूच आहे.

अहमदाबाद- गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा आमदारांचा सिलसिला सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यातील राधनपूरमधील काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अल्पेश ठाकोरबरोबर आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला आहे. अल्पेश ठाकोरबरोबर धवलसिंह ठाकोर आणि आमदार भरतजी ठाकोर यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे. अल्पेश ठाकोरला लोकसभा निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी जगदीश ठाकोर यांना तिकीट देण्यात आलं.अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसनं दुर्लक्ष केलं. अखेर त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश यांनी सेनेची बैठक बोलावली होती.  तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत आहेत. शुक्रवारी याबाबत मोठी घोषणा करणार आहे. तेव्हाच पुढील निर्णय सांगेन. यावर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ठाकोर यांच्याशी चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी हे ठाकोर यांनाची विचारा असे सांगितले.गुजरातमधील बलात्कार प्रकरण जबाबदार?एका अल्पवयीन मुलीवर उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये घडली. यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर हल्ले केले जात होते. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं आहे. यावरुन अल्पेश ठाकोर वादात सापडले होते. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना असल्याचा आरोप होत होता. याबद्दलचा ठाकोर यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता. यानंतर आता ठाकोर यांनी सारवासारव सुरू केली होती.  विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर अडचणीत सापडल्यावर काँग्रेसनंदेखील हात वर केले होते. ठाकोर दोषी असतील, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती. अल्पेश यांचे मित्र समजले जाणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सावध भूमिका घेतली होती. जर हिंसाचारमागे अल्पेश ठाकोरांचा हात असेल, तर त्यांना अटक केली जावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली होती. 

टॅग्स :Alpesh Thakorअल्पेश ठाकुरGujaratगुजरात