शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधील संभ्रम दूर, आघाडीच्या बैठकांना हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:51 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमचे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि पक्षाचे सहसचिव इरफान शेख यांनी पाटील यांची भेट घेतली व मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाल्याचा दावा केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा, याबाबतची भूमिका स्पष्ट न केल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मनसेच्या काहींची भूमिका आघाडीच्या उमेदवाराला आगरी समाजातील असल्याने सहकार्य करण्याची होती, तर काही पदाधिकाºयांना विशेषकरून शिवसेनेतून मनसेत दाखल झालेल्यांना ठाकरे यांच्या आदेशानंतरही राष्ट्रवादीची पाठराखण करण्यात अडसर वाटत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मनसेच्या नेत्यांनी चर्चा करून हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकांना मनसेच्या काही पदाधिकाºयांनी उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे.

सोमवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील एका हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आदींची बैठक पार पडली.राष्ट्रवादीचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश शिंदे यांनी प्रचाराच्या नियोजनासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीणचे विधानसभा अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली शहर संघटक तथा माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, निलेश भोसले, प्रकाश माने आणि सुदेश चुडनाईक आदी मनसे पक्षाच्या पदाधिकाºयांनी हजेरी लावली होती. पाटील यांचा प्रचार कशा पद्धतीने करायचा, याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम मात्र उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019