शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री शिंगणे यांच्या विधानाने मलिक यांचा खोटेपणा उघड; प्रसाद लाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:39 IST

दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील ‘रेमडेसिविर’चा साठा भाजप नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते. यासंदर्भात त्यांनी माझी भेटही घेतली होती, असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वाहिनीशी बोलताना केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील ‘रेमडेसिविर’चा साठा भाजप नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते. यासंदर्भात त्यांनी माझी भेटही घेतली होती, असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एका वाहिनीशी बोलताना केले आहे. त्यांच्या विधानामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. संकटकाळात असे खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली. 

कमिशन बुडाल्यानेच कुभांड रचले - दरेकरमुंबई : रेमडेसिविरसाठी टेंडर मागवले गेले पण कमिशनसाठी फायनल झाले नाही म्हणून काही जणांनी कुंभाड रचून आरोपांची राळ उडविल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. फार्मा कंपनीच्या मालकाला वाझे स्टाईल अटक करण्यात आली. त्यांनाघरातून ११ पोलिसांनी उचलून पार्ला पोलिस स्टेशनमधून डीसीपी कार्यालयात नेले, असे ते म्हणाले. 

गुन्हा दाखल करा : काँग्रेसची मागणीnरेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पायपीट करत आहेत. राज्य सरकारलाही या इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा होत नसताना दि. ८ व १२ एप्रिल रोजी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेर व नंदुरबारला हजारो इंजेक्शन्स वाटली. nहा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना त्यांनी ही औषधे खासगीरीत्या कशी वाटली? भाजप नेत्यांचे व ब्रुक फार्मा कंपनीचे रेमडेसिविरच्या काळाबाजारात संगनमत होते हे उघड आहे. त्यामुळे ब्रुक फार्मा कंपनी व इंजेक्शनचोर भाजप नेत्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या