शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

"रामाचं दर्शन घ्यायला आपण जगलो पाहिजे; उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:49 IST

माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देरामाचं दर्शन घेण्यासाठी आपण जगलो पाहिजेकोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हातीबाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका

मुंबई – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना आता राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केले. त्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, रामाचं दर्शन घेण्यासाठी आपण जगलो पाहिजे, आपण जगलो पाहिजे मग दर्शन घ्यायला जाऊ, माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. तर भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जात आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रण पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टेसिंग किती पाळतात बघावं लागेल असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

तर उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचं नातं आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही, राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले, ते राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने आम्ही केले, ते नातं कायम आहे असं स्पष्ट शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे.

कोरोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातील आमचे डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेत, धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने अशा शब्दात शरद पवारांच्या विधानावर  शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.  

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे