शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात लोक बदल करण्याच्या मन:स्थितीत- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:15 IST

महाराष्ट्रातील चौदा-पंधरा जिल्ह्यात आतापर्यंत जावून आलो.

कोल्हापूर : महाराष्ट्रातील चौदा-पंधरा जिल्ह्यात आतापर्यंत जावून आलो. सभांना मिळणारा प्रतिसाद आणि लोकांच्या चेहऱ्यांवरील भाव पाहता या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीस अनुकूल वातावरण तयार होत असून लोक बदल करण्याच्या मनस्थितीत असल्याचे निरीक्षण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे नोंदविले. राष्ट्रवादाबद्दल उत्तर तुम्ही द्यायला हवे ते सोडून तुम्ही मला कसले प्रश्न विचारता? अशीही विचारणा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सोडून मी अजून देशात गेलेलो नाही. त्यामुळे देशातील राजकीय स्थितीबद्दल सांगता येणार नाही परंतु राज्यातील चित्र दिवसेंदिवस काँग्रेस आघाडीला अनुकुल होत आहे. एखाद्या राज्यातील प्रचाराला पंतप्रधान एकदा किंवा दोनदाच येतो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत कारण त्यांच्या हे लक्षात आले आहे. त्यांच्या प्रत्येक सभेत आता पवार यांच्यावर टीका हा कॉमन अजेंडा झाला आहे. आपलं बरं चाललंय हाच त्याचा अर्थ आहे. त्यांनी अगोदर पवार कुटुंबियांवर व्यक्तिगत हल्ला केला; परंतु त्यास प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर त्यांचा टोन सुधारला. माझ्याबद्दल बरं बोलायचे परंतु संभ्रम निर्माण होईल असे प्रश्न उपस्थित करायचे, असा मोदी यांचा प्रयत्न आहे.तुमच्या पक्षाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली होती. माझ्या पक्षाची किंवा काँग्रेसनेही मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर कधीच आघाडी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादाबद्दल उत्तर तुम्ही द्यायला हवे ते सोडून तुम्ही मला कसले प्रश्न विचारता..? गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही काश्मीरमधील जनतेसमोर विकासाचा कार्यक्रम ठेवला परंतु गेल्या पावणेपाच वर्षात त्यातील एकाही गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे तेथील तरुणपिढीमध्ये संतप्त भावना आहे, असे ते म्हणाले.हे सीमेवरचे व अत्यंत संवेदनशील राज्य आहे. तिथे अनेक निर्णय संयमाने घ्यायला हवेत. जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी न झाल्याने स्थानिक तरुणांतून काही वेगळी भावना व्यक्त होत असेल तर तो दोष पंतप्रधान म्हणून तुमचा आहे. ते दुसऱ्यांवर ढकलण्याचाप्रयत्न आहे म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत. भारताच्या घटनेने एक पंतप्रधान दिला असताना दोन पंतप्रधान आले कोठून..? मोदी या प्रश्नांत देशाला चुकीच्या दिशेने नेत आहेत, असे पवार यांनी सांगितले.>हवा बदलेल तसे बदलतात ठाकरेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य असायचे परंतु ते सातत्य उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत नाही. हवामान बदलेल तसे ती भूमिका बदलत असल्याचा टोला पवार यांनी लगावला.>विधानसभेला राज ठाकरे यांच्याशी चर्चा होऊ शकतेलोकसभा निवडणुकीत राज ठाकरे ‘मोदी-अमित शहा यांना घालवा’ ही भूमिका घेऊन प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा लाभ त्या-त्या स्थानिक उमेदवारांना होईल. लोकसभेला आमची त्यांच्याशी कोणतीही आघाडी नाही परंतु राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार घालविण्यासाठी विधानसभेला त्यांना आघाडीतघेण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा होऊ शकते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019