शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: संभाजीराजे छत्रपतींची पवार, राज ठाकरेंशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:22 IST

Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी ते भूमिका जाहीर करणार आहेत.

 मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. शुक्रवारी ते भूमिका जाहीर करणार आहेत.संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने कसा पुढाकार घेतला पाहिजे या संदर्भात मी आजच्या भेटीत पवार यांच्याशी चर्चा केली. त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कुठल्या योजना लागू केल्या पाहिजेत या संदर्भात मी काही सूचना केल्या. ज्यांना नियुक्तिपत्रे दिलेली आहेत आणि ज्यांची निवड झालेली होती अशा सर्व मराठा उमेदवारांना तातडीने शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले पाहिजे, अशी भूमिकाही मी मांडली. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांनीही प्रश्न समजून घेतला. 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात फिरलो. लोकभावना जाणून घेतल्या. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणासाठीचा न्यायालयीन लढा सुरूच राहील. आंदोलनाबाबत काय ते मी उद्या बोलेन. मात्र, मराठा समाजाला सवलती देण्याची भूमिका शासनाने तातडीने घेतली पाहिजे.- खासदार संभाजीराजे छत्रपती

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे