शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’  गावांचा कारभार आता तरुणांच्या हाती; मतदारांची तरुणांना पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 00:01 IST

राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

सुनील घरतपारोळ : कोरोनाचे नियम पाळत ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. मतदारांनीही कोरोनाला बाजूला सारत, लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेत मतदान केले. वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली, पण यावेळी मात्र मतदारांनी तरुण उमेदवारांवर विश्वास टाकत त्यांना निवडून दिले. हेच तरुण कारभारी आता गावाचा कारभार करण्यासाठी सज्ज झाले आहे. सर्वात तरुण २६ वर्षांच्या उमेदवाराला सत्पाळा गावातील गावकऱ्यांनी निवडून दिले आहे.

नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. पालघर तालुक्यातील सांगावे तर वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा यात समावेश होता. ग्रामपंचायत सत्तेत या वर्षी निवडून आलेल्यांत तरुणांचा वाटा मोठा आहे. यात महिलांचाही मोठा वाटा आहे. राजकीय जीवनातील ग्रामपंचायत सदस्य ही पहिली पायरी मानली जाते. त्यांच्यातील गावाच्या विकासाच्या संकल्पना आता सत्तेत उतरणार आहेत.

सरपंच लाभणार तरुण? यावेळी निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी गावातील तरुणांना संधी देत, त्यांना राजकारणाची वाट मोकळी करून दिली. आता सरपंचदाचे नवीन आरक्षण जाहीर होणार असल्याचे यात नक्कीच तरुण उमेदवारांचा सरपंच म्हणून विचार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

महत्त्वाची निवडणूक विधानसभा निवडणुकीनंतर कोरोनामुळे कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यानंतरची ग्रामपंचायत निवडणूक पहिली ठरली. त्यामुळे सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. राजकीय पक्षांनाही निवडणूक जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागले. 

मतदारांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही पूर्ण करून, गावात जी काही विकासकामे आहेत, ती करण्याचा प्रयत्न करू, तसेच गावातील समस्या आहेत, त्यांचे निवारण करणे आमचे प्रथम प्राधान्य असेल. - रोहित प्रकाश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, पाली.

गावच्या विकासकामांना गती देऊ. गावातील गटारे, पाणी समस्या किंवा रोड लाइट असेल, अशी कामे आम्ही पूर्ण करू, तसेच महिलांसाठीच्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. वाचनालय, व्यायामशाळा यासाठीही आमचे प्राधान्य असेल.- संगीता मेघराज भंडार,ग्रामपंचायत सदस्य, सत्पाळा

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण