शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी अडचणीत; ऐन निवडणूक काळात दीड महिना प्रचार करू शकणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 10:34 IST

Mamata Banerjee, West Bengal Assembly Election: ममता यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारसभांना प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख असल्याने त्यांच्याशिवाय विजय खेचून आणणे सध्याच्या परिस्थितीत तृणमूलच्या नेत्यांना जमणारे नाही.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee leg fracture) आणि भाजपाला यंदाची पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची असतानाच ममता मोठ्या पेचात सापडल्या आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये तृणमूलच्या बाजुने कल दिसत असताना बुधवारी ममतांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे ममता यांचा पक्ष पिछाडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  (Doctor suggest to take rest for one and half month for Mamata Banerjee in Bengal Assembly Election days.)

ममता यांच्या दुखापतीची एक्सरे आणि एमआरआयद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये च्या उजव्या खांद्याला, मानेला दुय़खापत झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये समोर आले आहे. तर डाव्या पायाच्या टाचेला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आले आहे. ममता या जायबंदी झाल्या असल्याने त्यांना डॉक्टरांनी पुढील दीड महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ममता यांच्या प्रचारसभांना मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.

 ममता यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारसभांना प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख असल्याने त्यांच्याशिवाय विजय खेचून आणणे सध्याच्या परिस्थितीत तृणमूलच्या नेत्यांना जमणारे नाही. भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून तृणमूलला चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली असून अनेक नेते, आमदारही गळाला लावले आहेत. यामुळे ममतांचे प्रत्यक्ष सभांना, प्रचाराला असणे आणि जरी डिजिटली त्यांनी संबोधित केले तरी त्याचा परिणाम कमीच असणार आहे. 

नंदीग्राममध्ये नेमके काय घडले?ममता यांना दुखापत झाली हे खरे असले तरी देखील ममता यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याने असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ममता यांच्या पक्षाने तिथे 4-5 समाजकंटक होते. त्यांनीच ममता गाडीत बसत असताना दरवाजा ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्तरंजन दास नावाच्या तरुणाने तेथील घडलेला प्रकार सांगितला आहे. दासने सांगितले की, मी घटनास्थळी होतो. मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभे नव्हते. 

तर आणखी एक प्रत्यक्षदर्शी असलेली विद्यार्थीनी सुमन हिने सांगितले की, ममता यांना पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सर्वजण त्यांना घेरून उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मानेला दुखापत झाली. कोणी धक्का दिला नाही, त्यांची गाडी हळू हळू पुढे जात होती. या दोघांचे म्हणणे खरे मानले तर तृणमूलला या अपघाताचा किंवा हल्ल्याचा फायदा होण्याची शक्यता कमी दिसत आहे. 

निवडणूक कधी? 

 पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१