शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींनी दिला असंतुष्टांना धक्का; आझाद यांच्या निवृत्तीनंतर 'या' नावावर शिक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 03:55 IST

मल्लिकार्जुन खरगेंना राज्यसभा नेतेपद

- हरिश गुप्तानवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांची मुदत संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ व विश्वासू नेते मल्लिकार्जुन खरगे यांना राज्यसभेतील पक्षाचे नेते करून पक्षातील असंतुष्ट मंडळींना जोरदार धक्का दिला आहे.राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांना नेतेपद दिले जाईल, अशी चर्चा होती. ते स्वत:ही नेतेपदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. राज्यसभेतून निवृत्त झालेल्या गुलाम नबी आझाद यांनी आनंद शर्मा यांनाच राज्यसभेतील नेतेपद द्यावे, अशी विनंती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना केली होती. खरगे यांना नेतेपद दिल्याने आझाद यांची विनंती अमान्य झाली, हे उघड आहे. आनंद शर्मा यांना ते पद न देणे आणि आझाद यांची विनंती फेटाळून लावणे याचा अर्थ सोनिया गांधी यांनी असंतुष्टांना वा पक्षात वेगळी भूमिका मांडणाऱ्यांना दिलेला धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या दोघा नेत्यांसह अनेक मंडळींनी मध्यंतरी केली होती. तेव्हापासून ते असंतुष्ट म्हणून ओळखले जात आहेत. सोनिया गांधी यांनी शुक्रवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मल्लिकार्जुन खरगे यांची नेतेपदी नेमणूक केल्याचे कळविले आहे.पी.चिदम्बरम व दिग्विजय सिंग हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचाही सोनिया गांधी यांनी विचार केला नाही, हे स्पष्ट आहे. खरगे हे काँग्रेसचे राज्यसभेतील १७ वे नेते असतील. ते १६ फेब्रुवारी रोजी नेतेपदाची सूत्रे स्वीकारतील. ते राज्यसभेतील अधिकृत विरोधी पक्षनेतेही असतील.आझाद यांना मिळाला सर्वाधिक काळआझाद हे तब्बल पावणेसात वर्षे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पावणेसहा वर्षे, अरुण जेटली पाच वर्षे दोन महिने आणि जसवंत सिंह पाच वर्षे या पदी होते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRajya Sabhaराज्यसभाGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद